प्लीज या राजकारण्यांच्या हातचे मोहरे बनू नका
आरक्षण तुमचे यश-अपयश ठरवत नाही... तुमची उमेद आणि तुमचे श्रम या दोनच गोष्टी तुमचे आयुष्य बदलू शकतात.
चुकीच्या संगती पेक्षाही धोकादायक असतं ते चुकीचं ध्येय.
हातातला नकाशा चुकीचा असेल तर दिशाभूल झाल्याशिवाय राहणार नाही.

काम करणार्यांसाठी संधींची कमी नाही, ज्या राज्यानं बाहेरच्यांना रोजगार मिळवून दिला ते आपल्या भूमिपुत्राला उपाशी कसं राहू देईल?? जी संधी त्यांच्यासाठी आहे ती आपल्यासाठी ही आहे....पण त्या संधीचं सोनं कोण करतं हे महत्वाचं.
मित्रांनो, महाराष्ट्राची प्रतिष्ठा खुप मोठी आहे... आपल्या राजांची शिकवण, त्याचे आदर्श खुप थोर आहेत. आपल्या कर्तुत्वाने त्यावर शंका निर्माण होणार नाही, फक्त याची काळजी घ्या..
शेवटी "योग्यता" हीच जिंकणार्याची ओळख असावी... व्यक्तीची पात्रता तिच्या "गुणवत्ते"वरून ठरावी आणि "न्याय" या शब्दावर विश्वास उरावा, हाच "लोकशाही"चा आधार आहे.
बाजारपेठेत गेलाला प्रत्येक व्यक्ती यावर सहमत असेल की "सोन्याला ओरडून विकावं लागत नाही..."
मित्रांनो, आपल्यातली "धमक" कुठे वापरावी हे आपल्याला कळायला हवं.. कारण विध्वंस हा कधीही विकासाचा मार्ग असू शकत नाही...
मित्रांनो, आपल्यातली "धमक" कुठे वापरावी हे आपल्याला कळायला हवं.. कारण विध्वंस हा कधीही विकासाचा मार्ग असू शकत नाही...