Thursday, 16 July 2015

कधी तू.....कधी मी....कधी दोघेही.....

कधी मी रुसणार...

कधी तू हिरमुसणार...

कधी तू नि मी दोघेही.....

मग उगाचच सगळं ताणणार..


कधी मी सांभाळणार...

कधी तू समजून घेणार...

नाहीच घेतला दोघांनी तर सारं विस्कटणार....

मग तू दूर जाणार...

वा मी दुरवणार...

जुळवून नाही घेतला कि दरी उभी राहणार....


मग हवा असेल मी तुला...

हवी असेल तू ही मला...

पण उगाच वाट पाहणार..

मला वाटेल तू माघार ह्यावी..

तुला वाटेल यावेळी मी घेणार नाही....


मग असं होईल,

कि मला खूप वाटतं पण तिलाच गरज नाही...

आणि तू तीळ तीळ तुटत असशील याचा अंदाज मला नाही..


मग तू तिथेच,

मी तिथेच,

पण प्रेम असून नसल्यासारखं...

एकाच घरात परक्या सारखं....

मग वैतागलेला मी...

वैतागलेली तुही...

नि मुक्या भिंतीत, मुका संवाद राही..


कामात माझं मन नाही,

घरात तुझंही लक्ष नाही,

पण माघार दोघंही घेणार नाही..


मग एक दिवशी सकाळी,

तू उशिरा पर्यंत झोपलेली असणार...

बऱ्याच दिवसानंतर मी तुझापास येणार,

झोपेतच तू माझं नाव बरळत असणार...

त्या तापलेल्या अंगानं धडकी मज भरणार..

सगळं काही मग धूसर होवून जाणार..

मिठीत तुला घेऊन मी रडत बसणार.......


खरं सांगतो सखे, प्रेम तेव्हाही असणार...

भांडलो जरी कितीही, जीव तुझासाठीच तुटणार...

बोलेल वेड्यागत कधी, पण तुझ्या अबोल्याने पार वेडावणार...


PLEASE TAKE CARE OF YOUR LOVED ONES...

5 comments:

  1. Ultimate Yarr sis ....u r just awesome ....excellent...hats off to you

    ReplyDelete
  2. nice poem Gayatri....
    keep it up...
    also visit...
    http://fbkavita.blogspot.in/
    and
    historicalmaharashtra.blogspot.com

    ReplyDelete
  3. Sach hai yar . take care n give care

    ReplyDelete