Story of a King when his little Princess gets upset
सांग ना राणी काय आणु तुला
बोल की ग काही तोड की अबोला
इत्तुशा नाकावर रागाचा भार
गब्बू गब्बू गाल पण फुगलाय फार
छोट्याशा राणीचा मोठ्ठा राग
रागाचा तिच्या पडला धाक
कशाने पळवून लाऊ मी याला
सांग ना ग राणी तोड की अबोला
उशीर झाला म्हणून रुसलीये परी
उपाशी पोटी मग अबोला धरी
चूक तर बाबानं केलीये खरी
नि उद्या तो लवकर येणारे घरी
मग तर माफ करशील ना बाळा
सांग ना गा राणी तोड की अबोला
No comments:
Post a Comment