मैत्री चं स्थान या जगात इतकं उच्च का आहे माहितीये??
कारण ती रंग-वर्ण, जात-पात बघून जोडली जात नाही तर स्वभाव आणि विचारांवर आधारलेली असते..
तिथे सौदा नसतो, ती अगदी साधी असते,
तिथे औदा न बघता परस्पर आदर जपला जातो.
ती निखळ असते, निर्विकार असते..
जिथे कृष्ण राजा नसतो, सुदामा शूद्र नसतो ती एकमात्र मैत्री असते.
मैत्री ची जागा कोणतंच नातं घेऊ शकत नाही.
कारण ती नाळेनं जोडली, म्हणून सख्खी असत नाही.
ती जन्मजात मिळत नाही... मन जिंकून जोडावी लागते...
ती जबरदस्ती बांधलेलं बंधन नसते, ती मनापासून निभावलेलं नातं असते...
मग प्रश्न पडतो कि आयुष्यभर जे नातं जपायचंय ते "लग्न", मैत्रीत करावं कि नातलगात??
जिथे नाडी-पत्रिका जुळते तिथे बांधावं कि जिथे मनं जुळतात तिथे जोडावं??
जिथे जात मिळते तिथे टिकेल कि जिथे स्वभाव आणि विचार जुळतात तिथे बहरेल??
सगळ्या गोष्टी चोखंदळासारखे निवडणारे आपण स्टेटस लेबलस् आणि जातीचे टॅगज् बघून "लग्न बंधन" जोडतो हे विडंबन नाही तर काय??
माणूस म्हणून पारख करण्यापूर्वीच जे वर्थलेस फिल्टरस् आपण लावतो त्याने काय साध्य करतो??
अहो, मनं तोडून घरं जोडली जातात का कधी??
लग्न प्रतिष्ठेसाठी नव्हे तर पूरकतेसाठी करायला हवं.. ज्याला दोन जीवांचा मेळ म्हटलं जातं ते कुणाच्या अंतर्मनाच्या राखेची साक्ष देत असेल तर काय अर्थ त्या नवजीवनाला??

No comments:
Post a Comment