Friday, 7 August 2015

काही क्षण...

वाटेत कधी तरी उगीचच थांबा..
बाकड्यावर एखाद्या विश्राम घ्या..
अगदी निवांत फक्त बसून रहा..
थोडावेळ घड्याळ, मोबाईल बाजूला सारा
संथ वाहणाऱ्या वाऱ्यासोबत मनालाही वाहू द्या
अलगद, हळुवार डोळ्यांना मिटून घ्या..
कुणाच्या तरी चेहऱ्याला मनपटलावर येऊ द्या..
त्यांच्या मनसोक्त हास्यात क्षणभर रमून जा....
तुमच्याही नकळत त्याचं प्रतिबिंब तुमच्या ओठांवर असेल,
दिवस कसाही गेला असो, त्या क्षणाला त्याची फिकीर नसेल

तर असंच कोण्या एका बाकावर...कोण्या एका व्यक्तीसाठी...हळुवार फुलणाऱ्या त्या हास्यासाठी….कधीतरी...काही क्षण काढावेत आपल्या BUSY SCHEDULE  मधून...


No comments:

Post a Comment