मुलं हौशीनं किनाऱ्यावर रेतीचा मनोरा बांधतात
लाटेनं जो रेतीत मिसळतो,
तेव्हा नव्या उमेदीनं ते पुन्हा कामाला लागतात
लाटेपासून थोडं दूर जाऊन सजवतात
एक, दोन, करता करता पूर्ण नगरी उभारतात
त्या चिमुकल्या साम्राजावर जाम खुश होतात
पण तोवर निघायची वेळ होते
आपलं साम्राज्य मागे टाकून जड पावलाने राजे निघतात
मागे बघत, पाय रेंगाळत, मनाच्या उपरांत निरोप घेतात..
आणि बघता बघता एक मोठी लाट येते.
मागे फक्त अवशेष सोडून जाते...
मित्रांनो, आयुष्यही असंच असतं,
रंगवाल तितकं रंगणारं नि काळाच्या ओघात अवशेष बनून उरणारं...

No comments:
Post a Comment