Saturday, 8 August 2015

चालायचंच

कोण आहे हो Perfect  इथे?
प्रत्येकजण चुकतोच की..
मग तासभर तेच चघळण्यापेक्षा
‘चालायचंच’ म्हणून द्या सोडून...

जातो तोल, खुलते पोल..
कोण आहे इथे धुतल्या तांदळाचं,
मग उगाच Gossip करण्यापेक्षा,
‘चालायचंच’ म्हणून द्या सोडून...

जुळतात नाती, तुटतातही..
काचेची भांडी फुटतातही..
मग ते बोचणारे तुकडेच कुठवर वेचणार
‘चालायचंच’ म्हणून द्या सोडून...

No comments:

Post a Comment